महाराष्ट्र

सांगोला नगरपरिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांचा पगारवाढीसाठी बेमुदत संप ,शहर व उपनगरात स्वच्छतेची कामे ठप्प ,

सांगोला – सांगोला नगरपरिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी पगारवाढी साठी बुधवार १४ मे पासून अचानक बेमुदत संप पुकारल्यामुळे सांगोला शहरातील स्वच्छतेची कामे ठप्प झाली आहेत तर संपामुळे सलग दोन घंटागाडी न आल्यामुळे घरोघरी कचरा साचला असून दैनंदिन कचऱ्याची विल्हेवाट कोठे लावायची असा प्रश्न नागरिकांना पडला आहे दरम्यान ठेकेदार प्रतिनिधी व सफाई कामगार यांच्यातील पगार वाढीसंदर्भातील चर्चेची बैठक फिस्कटल्यामुळे संप चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे‌.

सांगोला नगरपरिषदेकडून शहर व उपनगरातील स्वच्छतेसाठी १ एप्रिल पासून पुणे येथील एका कंपनीला ठेका दिला आहे. शहर व उपनगरातील दैनंदिन स्वच्छतेची कामे सुमारे १३० महिला, पुरुष कंत्राटी सफाई कामगार करतात.यासाठी सांगोला नगरपरिषदेकडून १२ घंटागाडी मार्फत शहर उपनगरातील दैनंदिन कचरा सकाळी ७ ते दुपारी १:३० या वेळेत तर दुपारी २ ते ५ या वेळेत उचलून स्वच्छता साफसफाईची कामे केली जातात दरम्यान मागील दहा वर्षापासून कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना पगार वाढ केली नाही, सफाई कर्मचारी आहे त्याच मानधनावर काम करीत आहेत.ठेकेदाराकडून कर्मचाऱ्यांचा सहा -सहा महिने पीएफ भरला जात नाही. रविवारीची सुट्टी असताना मस्टरवर सही घेतली जाते पगार मात्र २६ दिवसाचाच दिला जातो‌ त्यामुळे पगार वाढीसह कर्मचाऱ्यांचा पीएफ वेळेत भरला जावा या मागणीसाठी बुधवार पासून सुमारे १३० महिला पुरुष सफाई कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे.


ठेकेदाराकडून सफाई कामगारांना ४३५ रुपये एवढे मानधन दिले जाते त्यातच ठेकेदाराकडून आमचा पीएफ भरला जात नाही. आम्हा कर्मचाऱ्यांना दररोज ५५० रुपये मानधन देण्यात यावे व आमचा १०० रुपये पीएफ भरला जावा अशी सफाई कामगारांची मागणी केली आहे परंतु ठेकेदारांनी नगरपरिषद अधिकाऱ्यांना हाताशी धरून सफाई कर्मचाऱ्यांची गळचेपी चालू केल्याचे सांगितले.


कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी पगार वाढीसाठी बेमुदत संप पुकारला आहे त्यामुळे शहरातील स्वच्छतेची दखल घेऊन नगरपरिषदेकडील कायमस्वरूपी सफाई कामगारांकडे स्वच्छता, साफसफाईची जबाबदारी दिली आहे. काल गुरुवारी ठेकेदार प्रतिनिधी व सफाई कामगार यांच्यात पगारवाढी संदर्भात बैठक झाली आहे. संपावर तोडगा न निघाल्यास संबंधित ठेकेदाराला नोटीस काढण्यात येईल -विनोद सर्वगोड आरोग्य निरीक्षक, नगरपरिषद सांगोला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button