महाराष्ट्र

सावे माध्यमिक विद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचा सत्कार संपन्न.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2025 मध्ये सावे माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व पालक यांचा सत्कार समारंभ सावे शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ सावे व सावे माध्यमिक विद्यालय, सावे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शेळके सर व प्रमुख पाहुणे म्हणून  श्री. डॉ. बाबासाहेब बंडगर (माजी कुलगुरू )पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर ,मा.श्री. भरत शेळके साहेब( माजी डी. वाय. एस. पी.) ,मा. श्री. मुरलीधर इमडे( सचिव, सावे शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ, सावे), दिलीप सरगर( खजिनदार ),विठ्ठल सरगर( संचालक )गंगाराम इमडे (संचालक), संतोष देवकते (संचालक) मार्केट कमिटी सांगोला,मा. श्री. शिवाजी वाघमोडे (लोकनियुक्त सरपंच, सावे ग्रामपंचायत) मा. श्री. डॉ. रावसाहेब शेळके( प्राध्यापक, शिक्षण शास्त्र महाविद्यालय, गारगोटी.) यांनी भूषविले.

प्रमुख पाहुण्यांची ओळख व कार्यक्रमाचे थोडक्यात प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. अर्जुन शेळके सर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्येचे दैवत सरस्वतीच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थिनींनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत स्वागत गीताने केले. त्यानंतर मा. श्री. डॉ. बाबासाहेब बंडगर (माजी कुलगुरू) यांचा सत्कार मुरलीधर इमडे ,दिलीप सरगर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच व्यासपीठावरील मा.भरत शेळके साहेब, डॉ.रावसाहेब शेळके, मुरलीधर इमडे, दिलीप सरगर, विठ्ठल सरगर, गंगाराम इमडे, संतोष देवकते, शिवाजी वाघमोडे, बाबासो बंडगर, शंभू माने, मेजर एकनाथ मेटकरी ,मेजर जगन्नाथ शेळके, पोपट बंडगर, शिवाजी पाटील (माजी पोलीस पाटील) भारत माने, संजय देवकते ,हरिदास सरगर ,वसंत रड्डी (ग्रामपंचायत सदस्य) सुरेश पारसे (ग्रामपंचायत सदस्य) बंडू माने (पोलीस), बाळासाहेब कुंभार (पोलीस), सिद्धेश्वर कुंभार, आनंदा बंडगर आदींचा सत्कार शाल, फेटा, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विद्यालयाच्या वतीने करण्यात आला.

त्यानंतर विद्यालयातील एस.एस.सी. परीक्षेतील गुणवंत विद्यार्थिनी कुमारी नलवडे वैष्णवी विठ्ठल हिने 93.80% गुण घेऊन विद्यालयात, चिंचोली केंद्रात व मराठी माध्यम सांगोला तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तिचा व तिच्या पालकांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला .कुमारी देवकते सुप्रिया रावसाहेब हिने 93.20% गुण घेऊन विद्यालयात व चिंचोली केंद्रात द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल तिचा व पालकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच वनिता हरिदास बंडगर यांनी 90.80% गुण घेऊन विद्यालयात तृतीय व कुमारी देवकते आकांक्षा राजाराम हिने 85.80% गुण घेऊन विद्यालयात चतुर्थ क्रमांक मिळवल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विद्यालयाचा माजी विद्यार्थी विशाल अर्जुन नलवडे याची इंडियन आर्मी मध्ये ट्रेडर्समन म्हणून निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच सावे शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ सावे या संस्थेचे सन्माननीय सचिव मा. मुरलीधर इमडे यांच्या सुविद्य पत्नी सौ इंदुमती जानकर मॅडम यांचाही सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला व भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यालयातील एन. एम. एम. एस. या परीक्षेत शिष्यवृत्ती पात्र झालेल्या पुनम बंडगर व संस्कृती देवकते यांचाही सत्कार करण्यात आला तसेच जिल्हा परिषद शाळा मेटकरीवस्तीचे मुख्याध्यापक मा.श्री. दुर्योधन इमडे गुरुजी यांचाही सत्कार आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल करण्यात आला. मा.श्री. रवींद्र जवंजाळ गुरुजी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक यांचाही सत्कार करण्यात आला तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व मार्गदर्शक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचाही सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला .

त्यानंतर गुणवंत विद्यार्थिनी सुप्रिया देवकते, वैष्णवी नलवडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच संतोष देवकते डॉ.रावसाहेब शेळके, भरत शेळके साहेब यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी भरपूर परिश्रम घेऊन जीवनात उच्च स्थानी पोहोचून विद्यालयाचे व गावाचे नाव उज्वल करावे असे सांगितले. त्यानंतर प्रमुख पाहुणे मा. श्री. डॉ. बाबासाहेब बंडगर माजी कुलगुरू यांनी आपल्या मनोगतामध्ये गुरूंची महती अनेक उदाहरणे देऊन सांगितली.गुरूंचे स्थान अमेरिका, फ्रान्स, दक्षिण कोरिया व जपान इत्यादी देशांमध्ये व्हीआयपी सारखं आहे असं त्यांनी आपल्या मनोगतातून मुलांना प्रेरणा देण्यासाठी अनेक उदाहरणे देऊन स्वतः चा आत्मविश्वास वाढवला पाहिजे, प्रत्येक संधीच सोनं केलं पाहिजे, जीवनात प्रत्येक गोष्ट शक्य आहे ते आपण करू शकतो आणि चांगल्याची संगत ठेवल्यानंतर आपल्याला यश निश्चित मिळते तसेच माणसाने स्वतःचे आयुष्य स्वतःसाठी न जगता दुसऱ्यासाठी जगाव अशा जगण्याचा हेवा तसेच जयजयकार झाला पाहिजे असे सांगून त्यांनी जीवनाची व्याख्या श्वास आणि नाव याच्या मध्ये आहे असे सांगितले .तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विषयी अनेक मार्मिक उदाहरणे देऊन आमच्या विद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना त्यांच्या मार्मिक वाणीने मंत्रमुग्ध केले. अशाप्रकारे या सत्कार समारंभासाठी बाबासो बंडगर ,शंभू माने, मेजर एकनाथ मेटकरी, मेजर जगन्नाथ शेळके, पोपट बंडगर, शिवाजी पाटील, भारत माने, रावसाहेब देवकते ,राजाराम देवकते, हरिदास बंडगर ,संजय देवकते, हरिदास सरगर, वसंत रड्डी, सुरेश पारसे ,बंडू माने पोलीस ,बाळासाहेब कुंभार पोलीस, प्रदीप सरगर युवा नेते ,विठ्ठल शेंडगे, भारत कोळी, पालक म्हणून सौ. राणी देवकते, सौ. उज्वला देवकते, सौ. अर्चना शेळके, सौ. पल्लवी नलवडे, विद्यालयातील आजी-माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी व समस्त सावे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील सहशिक्षक श्री. गावडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यालयातील सहशिक्षक श्री. बर्गे सर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button