महाराष्ट्र

उत्कर्ष विद्यालयातील विद्यार्थ्यांची आंध्रप्रदेश येथे विज्ञान शिबिरासाठी निवड

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संचलित उत्कर्ष माध्यमिक विद्यालय सांगोला येथील इयत्ता नववी तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांचे सेवा इंटरनॅशनल फाउंडेशन तसेच अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 11 मे ते 17 मे या कालावधी दरम्यान विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत व्हावा यासाठी ‘ अनुभूती कॅम्प ‘नामक विज्ञान शिबिर अगस्त्य कॅम्पस, कुप्पम, आंध्र प्रदेश येथे घेण्यात आले. या शिबिरासाठी भारतातून जवळजवळ शंभर विद्यार्थ्यांपैकी सात विद्यार्थी उत्कर्ष विद्यालयाचे महाराष्ट्र मधून निवडण्यात आले होते. वेगवेगळ्या राज्यांमधून म्हणजे केरळ ,आंध्र प्रदेश ,तेलंगणा ,कर्नाटक ,तमिळनाडू तसेच महाराष्ट्र या राज्यांमधून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती .या शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र ,रसायनशास्त्र, जीवशास्त्र ,गणित ,ॲनिमेशन, नवनिर्मिती प्रकल्प योजना अशा विविध विषयांवर अभ्यास केला. सुसज्ज प्रयोगशाळा, उत्तम अभ्यासक्रमाचे नियोजन ,विद्यार्थ्यांना स्वतः प्रयोग करून ज्ञान घेण्याची संधी ,रसायनशास्त्र भौतिकशास्त्र जीवशास्त्र यासारख्या क्लिष्ट विषयांचे मॉडेल्स च्या सहाय्याने अध्ययन व अध्यापन अशा विविध गोष्टींमुळे विज्ञान शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना खूप फायदा झाला .

या शिबिरातील सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे इनोवेशन हब म्हणजे नवनिर्मिती प्रकल्पा अंतर्गत तेथे आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी सहा दिवसात एक प्रकल्प तेथील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः बनवून सादर केला. त्या प्रकल्पांचा दर्जा खूपच उत्तम होता.
दररोज सकाळची सुरुवात सकाळी साडेपाच वाजता योगा, सूर्यनमस्कार, प्राणायाम ,विविध खेळ व त्यानंतर मुलांसाठी विशेष आरोग्यवर्धक काढा यांनी होत असे. त्यानंतर दिवसभरामध्ये वेगवेगळ्या सत्रांमधून वर वर्णन केलेल्या सर्व विषयांचे मार्गदर्शन संपन्न होत असे. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा पुरेपूर विचार करून सर्व नियोजन उत्तम प्रकारे करण्यात आले होते.

 

विद्यार्थ्यांची नाश्ता तसेच जेवणाची सोयही उत्तम होती. या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थ्यांनाही शिबीर खूप आवडले. तसेच विज्ञान विषयातील त्यांची रुची ही अधिक वाढली. नक्कीच विद्यार्थ्यांना या शिबिराचा त्यांच्या शैक्षणिक जीवनातच नव्हे तर दैनंदिन जीवनात सुद्धा खूप उपयोग होईल. या शिबिरासाठी विद्यार्थ्यांसोबत सौ क्रांती सूर्यवंशी तसेच सौ निर्मला भोसले या दोन शिक्षिका उपस्थित होत्या. या शिबिरासाठी सर्व माननीय संस्था पदाधिकारी तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय कुलकर्णी सर तसेच सर्व शिक्षक वृंद या सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button