महाराष्ट्र

सांगोला फॅबटेक मध्ये डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात*

  शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता सांगोला येथील फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेला मंगळवार दिनांक २० मे २०२५ पासून सुरुवात झाली. असल्याची माहिती फॅबटेक पाॅलिटेक्निक काॅलेजचे प्राचार्य तानाजी बुरूगंले यांनी माहिती दिली.

    फॅबटेक पाॅलिटेक्निक काॅलेज सांगोला मध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी सुविधा केंद्र (६७५६) ला मान्यता मिळाली असून मंगळवार दिनांक २० मे २०२५ पासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती या प्रक्रियेला सुरू झाली आहे.

डिप्लोमा इंजिनिअरिंग साठी प्रवेश घेऊ इच्छुक विद्यार्थ्यांना फक्त दहावीच्या परीक्षेचा आसन क्रमांक टाकून प्रवेश अर्ज भरता येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना जन्म प्रमाणपत्र किंवा रहिवाशी दाखला आवश्यक आहे.

       हि ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया हि २० मे २०२५ ते १६ जुन २०२५ या कालावधीत होणार असुन प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरून अर्ज छाननीची योग्य पद्धत निवडून ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायांकित प्रत अपलोड करणे तसेच आपल्या प्रवर्गासाठी कागदपत्रांची पडताळणी करून आपला प्रवेश अर्ज निश्चित करू करता येणार आहे.

    दिनांक १८ जुन २०२५ रोजी मंडळाच्या संकेतस्थळावर तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रकाशित करण्यात येणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेश अर्जात काही त्रुटी असल्यास दिनांक १९ जुन २०२५ ते २१ जुन २०२५ कालावधीत अर्ज दुरुस्त करता येणार आहेत. दिनांक २३ जुन २०२५ रोजी अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

   प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रिया संदर्भात तसेच कागदपत्रांसाठी येणाऱ्या अडचणी, शंका तसेच मार्गदर्शनासाठी फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज सांगोला येथील सुविधा केंद्रात येऊन माहिती घेण्याचे आवाहन प्राचार्य तानाजी बुरूगंले यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button