आदित्य ठाकरे संगेवाडी येथे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; सरकारवर साधला निशाणा

सांगोला(प्रतिनिधी):- नुकसान सगळी कडे झाले आहे परंतु मंत्री मंडळाची अजुन बैठक झाली नाही त्यामुळे त्यांना शेतकऱ्यासाठी अजुन वेळ मिळाला नाही. राज्यात सध्या केवळ राजकारण सुरू आहे परंतु शेतकऱ्याच्या बांधावर अजूनही कोणी आले नाही याचे मला दुःख वाटत असून मी गद्दारांकडे जास्त लक्ष देत नसल्याचे टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
सांगोला तालुक्यातील संगेवाडी व मांजरी येथील नुकसानग्रस्त भागाची माजी पर्याटन मंत्री व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज बुधवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी पाहणी केली.यावेळी त्यांचेसोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ, शिवसेना नेते लक्ष्मण हाके, युवा सेना विस्तारक उत्तम ऐवळे, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे,सुर्यकांत घाडगे, कमरुद्दीन खतीब यांच्यासह शिवसैनिक, युवा सैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संगेवाडी व मांजरी येथील शेतकर्यांच्या बांधावर जाऊन यावेळी आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबतची माहिती शेतकर्यांकडून जाणून घेतली. आदित्य ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकर्यांना यावेळी धीर देण्याचे काम केले.यावेळी शेतकर्यांनी सरसकट पंचनामे करावेत अशी मागणी आदित्य ठाकरे यांचेकडे केली. आदित्य ठाकरे यांनी यावेळी शेतकर्यांच्या व्यथा देखील समजून घेतल्या.
यावेळी तहसीलदार अभिजित पाटील, कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांच्यासह प्रशासनातील सर्व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.