महाराष्ट्र

प्रा.पी.सी. झपके सरांच्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे 225 जणांनी रक्तदान

नाझरा(वार्ताहर):- सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष व सांगोला नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्राध्यापक प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७१  व्या  वाढदिवसानिमित्त नाझरा विद्यामंदिर प्रशालेत आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 225 रक्तदात्यांनी आपला रक्तदानाचा हक्क बजावला.

युवा नेते डॉ. विजय सरगर,सुनिल कांबळे, कोंडीबा वाघमारे, सरपंच नाथा खंडागळे,उपसरपंच मोहन मिसाळ , माजी सरपंच विनायक मिसाळ , जालिंदर मिसाळ, उमेश, मिसाळ, पिंटू बंडगर, ग्रामपंचायत सदस्य सुनील अडसूळ, जीवन कांबळे, सोमनाथ कारंडे, राजेंद्र अडसूळ , मुख्याध्यापक बिभीषण माने , पर्यवेक्षक म . ज्ञा. धायगुडे, नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मंगल पाटील व्ही .डी. पाटील व विद्यामंदिर परिवारातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले.

तहसीलदार संतोष कणसे,नायब तहसीलदार साळुंखे रावसाहेब,संस्था सचिव म. श. घोंगडे,संस्था कार्यकारणी सदस्य डी. डी. जगताप, सांगोला विद्यामंदिर चे प्राचार्य अमोल गायकवाड, कोळा विद्यामंदिरचे प्राचार्य श्रीकांत लांडगे, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, सुरेश मस्तुद, मच्छिंद्र इंगोले, चारुदत्त जगताप, वरिष्ठ लिपिक हेमंत नलवडे,लायन नरेंद्र होनराव,शंभू झपके, प्रसाद खडतरे प्रशांत रायचुरे, रेवनील ब्लड सेंटर सांगोला चे सोमेश यावलकर आदी मान्यवरांनी भेट देत रक्तदान संयोजनाबाबत समाधान व्यक्त केले.

सदर रक्तदान शिबिरात नाझरे, चोपडी,हातीद,बलवडी, सरगरवाडी चिनके अनकढाळ, उदनवाडी, लोटेवाडी,वझरे, अहिल्यानगर आदी परिसरातील रक्तदात्यांनी रक्तदानाचा हक्क बजावला.सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी विद्यामंदिर परिवारातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सकाळी आठ ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत चाललेल्या रक्तदान शिबिरासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे आभार प्राचार्य बिभीषण माने यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button