महाराष्ट्र

प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे वाढदिवसानिमित्त लक्ष्मीदहिवडी येथे नेत्र तपासणी शिबिर संपन्न

सांगोला ( प्रतिनिधी ) आंतरराष्ट्रीय लायन्स संघटना विविध क्षेत्रात समाजाच्या उन्नतीसाठी कार्यरत आहे.यानुसार सांगोला लायन्स क्लबकडून सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांमध्ये गरजूंच्या दारापर्यंत मोफत नेत्र तपासणी शिबिराच्या माध्यमातून वेळोवेळी सेवा दिली जाते. याचप्रमाणे दि.२२ मे २०२५ रोजी मार्गदर्शक माजी प्रांतपाल ला‌. प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोला, श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन लायन्स आय हॉस्पिटल सांगली व ग्रामपंचायत लक्ष्मीदहिवडी यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मीदहिवडी ता.मंगळवेढा येथे मोफत डोळे तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. यामध्ये ११० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली व ९ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी सांगली येथे लायन्स आय हॉस्पिटलकडे रवाना करण्यात आले.

यावेळी उद्घाटन समारंभामध्ये सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.उन्मेश आटपाडीकर यांनी वेळेत डोळे तपासणी व वेळेत उपचार मिळणे आवश्यक आहे हा विचार प्रमाण मानून लायन्स क्लब सांगोला प्रत्येकाच्या दारी जाऊन त्यांना सेवा देत आहे.असे सांगत शिबिराच्या माध्यमातून कमी खर्चात व मोफत होणाऱ्या शस्त्रक्रिया संदर्भात माहिती दिली. यावेळी लक्ष्मी दहिवडीचे सरपंच अनिल पाटील यांनी प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सरांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचे काम या शिबिराच्या माध्यमातून होत आहे. याचा मनस्वी आनंद होत आहे असे सांगत आयोजनाबद्दल सांगोला लायन्स क्लब, ग्रामपंचायत लक्ष्मीदहिवडी सदस्य, ग्रामस्थ,प्रा.तटाळे सर व सहकारी शिक्षकांचे कौतुक केले. यावेळी व्यासपीठावर सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य ला‌.अमोल गायकवाड, कॅबिनेट ऑफिसर ला.प्रा. धनाजी चव्हाण,सांगोला लायन्स क्लबचे सचिव ला.अजिंक्य झपके, खजिनदार ला.नरेंद्र होनराव, लायन्स आय हॉस्पिटल सांगलीचे डॉ.रियाज मुल्ला,लक्ष्मी दहिवडी पोलीस पाटील मधुकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य तानाजी पाटील,जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक दिगंबर बनसोडे गुरुजी व जगन्नाथ पाटील गुरुजी उपस्थित होते.

शिबिरासाठी लायन्स क्लब ऑफ सांगोला सदस्य ला.प्रा.प्रसाद खडतरे,ला.प्रशांत रायचुरे,ला.प्रा.नवनाथ बंडगर, सांगोला विद्यामंदिरचे प्रा.नागन्नाथ म्हमाणे,प्रा.सौ.विजया फुले , सुवर्णा साळे,गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ला.प्रा.शिवशंकर तटाळे यांनी केले सूत्रसंचालन ला.प्रा.महेश जुंदळे यांनी केले तर आभार प्रदर्शन नागेश पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button