सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष , सांगोला तालुका उच्च शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष तसेच विरशैव लिंगायत समाजाचे मार्गदर्शक प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचा ७१ वा वाढदिवस २३ मे रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पेपर मधील जाहिरातबाजी, शुभेच्छारुपी हार, गुच्छ यांना नेहमीच विरोध करणारे झपके सर यांचा वाढदिवस महारक्तदान शिबिराने साजरा होतोच पण या वाढदिवसाचे औचित्य साधून सांगोला शहरातील युवा उद्योजक व हॉटेल व्यावसायिक गणेश भद्रशेट्टी मित्रपरिवाराकडून सांगोला येथील मातोश्री वृद्धाश्रमात अन्नदान करून वेगळ्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली. यावेळी गणेश भद्रशेट्टी, प्रसाद खडतरे, प्रशांत रायचुरे, अमोल कोरे व महेश स्वामी उपस्थित होते. या अन्नदान साठी मातोश्री वृद्धाश्रमाचे संचालक श्री. जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.