महाराष्ट्र

सांगोला फॅबटेकच्या फार्मसी मध्ये “एम फार्म” या कोर्सेच्या दोन शाखांना मान्यता

सांगोला फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मधील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये पी सी आय कडून एम फार्म या कोर्सेच्या दोन शाखांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठांतर्गत नुकतीच मान्यता मिळाली असल्याची माहिती फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठांतर्गत फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये मास्टर ऑफ फार्मसी (एम. फार्म) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता देण्यात आली आहे. फार्मसी मध्ये पदवी बी. फार्म पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा २ वर्षाचा अभ्यासक्रम असणार आहे. यामध्ये फार्मास्युटिक्स साठी १५ विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आणि क्वालिटी ॲश्युरन्स १५ विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असुन या दोन विषयांचा समावेश आहे.

   मास्टर ऑफ फार्मसी (एम. फार्मसी) पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. याशिवाय आरोग्य सेवा, क्लिनिक, औषध उद्योग क्षेत्रात काम करण्याची संधी भेटणार आहे. एम फार्म या पदव्युत्तर शिक्षणासाठी फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी मधील दोन शाखांना मान्यता प्राप्त झाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये एम फार्म कोर्सला मान्यता प्राप्त झाल्याने फॅबटेक एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डॉ. संजय बैस, सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांकडून या मान्यतेचे स्वागत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button