महाराष्ट्र
जुन्या पेन्शनचे याचिका कर्ते श्री प्रदीप महल्लै सर यांची सांगोला येथे सदिच्छा भेट

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व नंतर १००% अनुदानावर आलेले शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन मिळावी याकरिता सर्वोच्च न्यायालय दिल्ली. येथे २०१५ पासून सतत पाठ पुरावा करीत असलेले मुख्य याचिकाकर्ते श्री प्रदीप महल्ले, दीपक बोकडे, प्रशांत पुसदेकर, सचिन पिसे. हे दिनांक ८ जून २०२५ रोजी कोल्हापूर येथे होत असलेल्या शिक्षक मेळाव्यास जात असतांना श्री अण्णासाहेब गायकवाड. सर यांचे निवासस्थानी सांगोला येथे सदिच्छा भेट दिली.
यावेळी जुनी पेन्शन बाबत चर्चा करताना आमचे मार्गदर्शक सुनील भोर, शिक्षक नेते अण्णासाहेब गायकवाड, कृष्णदेव बेहरे, रामचंद्र जानकर, श्री. संजय वाळे, श्री देविदास खेडकर, श्री देवराम दरेकर, श्री राजेंद्र जाधव इत्यादी उपस्थित होते.