सांगोला तालुक्यातील सोनंद गावचे सुपुत्र मेजर हवालदार संभाजी बाबासाहेब काशीद हे भारतीय सेनेमध्ये 18 वर्षे सेवा देऊन निवृत्त झाले आहेत त्यानिमित्त माजी सैनिक कल्याणकारी संस्थेच्या वतीने सत्कारचे आयोजन करण्यात आले होते .
मेजर हवालदार संभाजी बाबासो काशीद यांनी भारतीय सेनेमध्ये असताना भारतातील विविध ठिकाणी आपली सेवा चंदिगड ले लडाख भटिंडा अलमोरा हाय अल्टिट्युड ठिकाणी आपली सेवा अत्यंत चांगल्या प्रकारे दिली आणि अठरा वर्षे सेनेमध्ये कार्य करून ते सुखरूप आपले मायदेशी परतले.
माजी सैनिक कल्याणकारी संस्था सोनंद यांनी त्यांचा मिरवणूक काढून आणि सेवापूर्ती सत्कार समारंभ सोनंद येथे आयोजित केला होता सत्कार समारंभासाठी सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि सैनिकासाठी जे काही मदत लागणार आहे ती यथोचित मिळेल याची ग्वाही ग्रामपंचायत तहसीलदार आणि पोलीस स्टेशन यांच्याकडे मिळेल. तसेच सैनिकासाठी तालुका लेवल येथे एक ऑफिस लवकरच आमदार फंडातून कार्यान्वित होईल असे सांगितले.
यावेळी माजी सैनिक कल्याणकारी संस्थेच्या वतीने मेजर हवालदार सुभाष बाबासो काशीद यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला आणि पुढील इनिंगसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सदर सत्काराच्या कार्यक्रमाचे नियोजन सोनद माजी सैनिक कल्याणकारी संस्थेच्या वतीने करण्यात आले होते.माजी सैनिकांचे सेवापूर्ती नंतर गावोगावी सत्कार होत असल्यामुळे सर्व भागांमध्ये देश प्रेम जागृती होत असल्याचे चिन्ह स्पष्ट दिसत आहे आणि त्याप्रमाणे नवी पिढी तयार होत आहे आणि तयार व्हावी यासाठी ग्रामपंचायत नगरपालिका तसेच पंचायत समिती या कार्यालयाने आशा कार्यामध्ये आपले योगदान द्यावे कारण आपणही या देशासाठी सैनिकासाठी काहीतरी करावे जेणेकरून आपली ही देशसेवा घडेल असे सामान्य नागरिकाकडून बोलले जात होते