महाराष्ट्र

वासुद (अकोला) गाव प्रदूषणमुक्त करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

सांगोला :- सांगोला तालुक्यातील वासुद (अकोला) गावातील सुज्ञ नागरिक, वृक्षप्रेमी, डॉक्टर, नोकरी निमित्त परगावी असणारे तरुण, सेवानिवृत्त झालेले कर्मचारी व ग्रामपंचायत सदस्य इत्यादींनी एकत्र येऊन सन २०२४ मध्ये गावठाण परिसरात पर्यावरणपूरक ४०० वृक्षाची लागवड केली. व ती सर्व झाडे चांगल्या प्रकारे संवर्धन करून गावठाण भाग व गावातील रस्त्याच्या दोन्ही बाजू हिरव्यागार व प्रसन्न केल्या आहेत.

 

गावातील प्रत्येक नागरिक या सर्व झाडांची काळजी घेतात. तसेच चालू वर्षी पर्यावरण पूरक ४०० वृक्षाची लागवड करणार असल्याचा निर्णय सर्वांनुमते घेण्यात आला. त्याकरिता निधी संकलन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत माणगंगा भ्रमणसेवा संस्थेने आवाहन केल्याप्रमाणे बहुतांशी वृक्ष लागवड माणगंगा नदी काठावर करून वृक्ष संवर्धन स्पर्धेत भाग घेण्याचे ठरले. तसेच संपूर्ण गावातील नदीकाठावरील व परिसरातील पाणी वाचवण्यासाठी व गाव स्वच्छ रहावे या उद्देशाने संपूर्ण गावठाण क्षेत्र, नदीपात्र चिलार मुक्त करण्याचा संकल्प सुदाम भोरे यांनी माडला व सर्वांनी त्यास प्रोत्साहन देऊन या कामास लगेच सुरुवात करण्यात आली.

 

ब्ल्यू जेट हेल्थकेअरचे संचालक व वासुदगावचे रहिवासी पोपट केदार यांनी त्यांच्या कंपनीच्या वतीने दहा हजार कापडी पिशव्यांची वाटप करून गाव प्लास्टिक मुक्त करण्याचे आवाहन केले. तेथील गावकऱ्यानाही कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. गावातील सुज्ञ नागरिकांनी एकत्र येऊन गावासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने नद्या, निसर्गाचे पावित्र्य वाढवून गाव पर्यावरण संतुलित करण्यामध्ये सांगोला तालुक्यातील पहिलेच गाव वासुद असेल अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत होत्या. वृक्ष लागवड व संवर्धन स्पर्धेत माण नदीकाठच्या जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन नदीची नैसर्गिक शोभा वाढवावी. असे आवाहन माणगंगा भ्रमणसेवा संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे यांनी केले.

 

या बैठकीत किशोर शास्त्री, सुदाम भोरे, बाळासाहेब सावंत ,पोपट तात्या केदार, शिवाजीराव खटके, विष्णुपंत केदार, सचिन शिंदे, राजेंद्र केदार, शशिकांत केदार इ. नी मार्गदर्शन केले. या बैठकीसाठी सिंगु बिरू खटके, रमेश सावंत ,मधुकर पवार ,नारायण आदलिंगे ,रवी मराळ, विजयकुमार भोरे, दत्तात्रय शास्त्रे, चंद्रकांत सावंत ,चंद्रकांत भोरे ,सुनील सावंत ,सुनील खटके इ.सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button