सोलापूर जिल्ह्यातील प्रथम महिला: आंतरराष्ट्रीय आट्यापाट्या खेळाडू

आट्यापाट्या हा भारतातील प्राचीन पारंपरिक खेळ असुन हा खेळ महाराष्ट्र राज्यांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. अशा या आट्यापाट्याच्या खेळात फॅबटेक पाॅलिटेक्निक काॅलेज मधील प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेली कुमारी समृद्धी राजेंद्र यादव हिने आंतरराष्ट्रीय पातळीवर आट्यापाट्याच्या खेळात सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल तिचा संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर डाॅ. अमित रूपनर यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले असल्याची माहिती फॅबटेक पाॅलिटेक्निक काॅलेजचे प्राचार्य प्रा. तानाजी बुरूगंले यांनी दिली.
भूतान येथे ३१ मे ते १ जुन २०२५ या कालावधीत आंतरराष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ पाॅलिटेक्निक मध्ये डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्ष इंजिनिअरींग मध्ये शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी कुमारी समृद्धी राजेंद्र यादव हिने भारतीय संघातून सुवर्णपदक पद प्राप्त केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील प्रथम महिला आंतरराष्ट्रीय आट्यापाट्या खेळाडू असल्याचा मान कुमारी समृद्धी राजेंद्र यादव हिने मिळाला आहे.
कुमारी समृद्धी यादव हिच्या यशाबद्दल फॅबटेक एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य प्रा. तानाजी बुरूगंले आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.