सांगोला तालुका

कमलापूर येथे कापड दुकानात चोरी; 58 हजार 169 रुपये किंमतीच्या साड्या नेल्या चोरुन

सांगोला(प्रतिनिधी):-दुकानाच्या वरील पत्र्याचे नट-बोल्ट काढुन पत्रा कापून  कापड दुकानात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने 58 हजार 169 रुपये किंमतीच्या नववारी व  सहावारी वेगवेगळ्या कंपनीच्या वेगवेगळ्या साड्या चोरून नेल्या असल्याची घटना कमलापूर येथे घडली.  घटनेची फिर्याद नागेश कशिलकर रा.कमलापूर यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नागेश कशिलकर यांचे कमलापूर ते अजनाळे जाणारे रोडवरती  श्री.समर्थ कलेक्शन नावाचे कापड दुकान आहे. दि. 06 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 10 वाजताचे सुमारास  दुकान बंद करुन ते घरी गेले होते. दि. 07 नोव्हेंबर रोजी सकाळी  सकाळी 8  वाजण्याचे सुमारास नेहमीप्रमाणे दुकान उघडुन दुकानात आतमध्ये गेल्यावर दुकानातील कापड साहीत्य विस्कटलेले दिसले. दुकानातील कापड साहित्य कमी दिसले व दुकानात चोरी झाल्याचा संशय आल्याने व दुकान पत्याचे असल्याने दुकानाचे आजुबाजुस पत्रे तपासून पाहीले असता दुकानाचे वरिल छताचा पत्याचे नट-बोल्ट काढून पत्रा कापून दुकानात प्रवेश करुन दुकानातील कापड साहीत्य कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!