सांगोला तालुका

आ.आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या गर्दीचा फायदा घेवून चोरट्याचा पाकीटावर डल्ला

सांगोला(प्रतिनिधी):- माजी पर्यावरण मंत्री आ.आदित्य ठाकरे यांच्या मांजरी ता.सांगोला येथील सभेमध्ये गर्दीचा फायदा घेवुन  खिशातील पाकीट व त्यामधिल रोख रक्कम 4500 रुपये, आधारकार्ड, पॅनकार्ड, पोस्टकार्ड कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली असल्याची घटना काल बुधवार दि.9 नोव्हेंबर रोजी घडली. सदर चोरीची फिर्याद दत्तात्रय जगन्नाथ लिगाडे (शाखाप्रमुख, शिवसेना बनाळी ता.जत,जि.सांगली ) यांना फिर्याद दिली आहे.
दत्तात्रय लिगाडे हे  काल दि. 09 नोव्हेंबर रोजी  दुपारी 12/30 वाजताचे सुमारास आदित्य ठाकरे यांची मौजे मांजरी ता सांगोला जि सोलापूर येथे सभा असल्यामुळे सभेसाठी आले होते. दुपारी 02.30 वाजण्याचे सुमारास संभा संपली. सभा संपल्यावर  चहा पिण्यासाठी मित्रासमवेत चहाचे हॉटेललमध्ये गेले होेते. त्याचवेळी चहा पिल्यानंतर चहाचे बिलाचे पैसे देण्यासाठी पाकीट काढत असताना खिशातील पाकीट मिळुन आले नाही. त्यामुळे सभेच्या ठिकाणी पाकीटाचा शोधशोध केली परंतु  पाकीट मिळुन आले नाही. त्यामुळे  सभेतील गर्दीचा फायदा घेवुन खिशातील पाकीट कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!