विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे कायदेविषयक शिबीर संपन्न

सांगोला(प्रतिनिधी):- स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या स्मरणार्थ पॅन इंडिया जनगाजगृती उपक्रमाअंतर्गत महिलानां मूलभूत कायदेशीर सहाय्य प्रदान करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशान्वये सन्माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. एस.ए.ए.आर.औटी यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान महाविद्यालय, सांगोला येथे दिनांक 09 नोव्हेंबर रोजी रोजी तालुका विधी सेवा समिती, सांगोला व सांगोला विधिज्ञ बार असोशिएशन यांचे मार्फत कायदेविषयक शिबीर आयोजित करणेत आले.
सदर शिबिरामध्ये अॅड.सचिन पाटकुलकर यांनी लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यांबाबत उदाहरणांसह मार्गदर्शन केले.अॅड भारत बनकर यांनी स्थावर मिळकतीमधील महिलांचे अधिकार याबाबत सखोल मार्गदर्शन उदाहरणांसह केले. अॅड शिवानंद पाटील यांनी सायबर क्राइम कायद्यांची माहिती त्याबाबतचे फायदे व तोटे याबाबत सखोल माहिती दिली.
शिबिराचे अध्यक्ष श्रीमती एस. के. देशमुख प्रमुख दिवाणी न्यायाधीश सांगोला यांनी वरील विषयावर उदाहरणांसह कायदेविषयक ज्ञान तसेच विधी सेवा समितीची माहिती उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थीनीनां करून दिली. तसेच त्यांनी विद्यार्थिनीनां सायबर क्राइम बाबत माहिती देवून सर्तक राहण्याबाबत मार्गदर्शन केले. सदर शिबिरामध्ये डॉ. सीमा गायकवाड यांनी सूत्र संचालन केले. अॅड धनंजय मेटकरी यांनी शिबिराची प्रस्तावना केली.
सदर शिबिरामध्ये सांगोला न्यायालयातील प्रमुख दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस.के. देशमुख मॅडम, सांगोला विधिज्ञ बार असो. चे अध्यक्ष श्री. डी. जी. मेटकरी, विज्ञान महाविद्यालय सांगोल्याचे प्राचार्य डॉ. रघुनाथ फुले, उपप्राचार्य संभाजी शिंदे, सांगोला बार असो.चे सचिव अॅड आप्पासाहेब लवटे, अॅड. व्ही. बी. चव्हाण, अँड. गजानन भाकरे, अॅड. आर. आर. केदार, अॅड. बोराडे, प्राध्यापक कुंभार सर,विज्ञान महाविद्यालयाचे कर्मचारी न्यायालयीन कर्मचारी, पोलिस पैरवी संभाजी शिंदे उपस्थित होते. सदर शिबिरामध्ये अॅड. श्री. आनंदा बनसोडे यांनी आभार प्रदर्शन केले. सदर कार्यक्रम हा यशस्वी पार पाडला. या सर्व शिबिराचे नियोजनाबाबतचे मार्गदर्शन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री नरेंद्र जोशी साहेबांनी केल्याने त्यांचे आभार मानण्यात आले.