नाझरे येथील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू
सांगोला (प्रतिनिधी) माण – नदीपात्रात पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नाझरे ता. सांगोला येथील माण नदीपात्रात घडली आहे. स्वप्नील रणदिवे असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव होय.