सांगोला प्रतिनिधी: सांगोला तालुका विज्ञान अध्यापक मंडळ यांच्यावतीने शुक्रवारी सांगोला विद्यामंदिर प्रशालेत तालुक्यातील प्रत्येक प्रशालेतील विज्ञान विषयात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.अमोल गायकवाड सर मुख्याध्यापक सांगोला विद्यामंदिर, प्रमुख पाहुणे श्री. लक्ष्मीप्रसाद मोहिते उपाध्यक्ष राज्य विज्ञान महामंडळ ,प्रमुख उपस्थिती प्रा. संजय शिंगाडे सर उपमुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल सांगोला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून व अहमदाबाद विमान दुर्घटना मृत व्यक्ती श्रद्धांजली कार्यक्रम करून सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये विज्ञान मंडळाचे कार्य व वर्षभराचे नियोजन याची माहिती तालुका सचिव अतुल लुंगारे सर यांनी सांगितली. सांगोला तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे कार्य हे कौतुकास्पद आहे व गेली सोळा वर्ष सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाच्या मदतीने वेगवेगळे उपक्रम राबवून या विभागाचे कार्य चालते ,तसेच विद्यार्थ्यांनी केलेले परिश्रम व विज्ञान मार्गदर्शक शिक्षक यांच्यामुळे विज्ञान विषयात घवघवीत यश मिळवता आले असे मत प्राचार्य अमोल गायकवाड सरांनी अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले.
जिल्हा अध्यापक मंडळाच्या प्रत्येक कार्यात सर्वात आगोदर सांगोला तालुका सहभागी होतो व सुरूवातीच्या 2008 -09 च्या कार्यक्रमाची व त्याच्या आयोजनाची तसेच मंडळातील त्या काळातील सदस्यांनी केलेल्या कामाच्या आठवणींना उजाळा दिला.ग्रामीण भागाचे विद्यार्थी असून त्यांनी विज्ञान विषयात मिळविलेल्या गुणांचे कौतुक प्रमुख पाहुणे लक्ष्मीप्रसाद मोहिते सर यांनी केले.
गुणवंत विद्यार्थी,त्यांचे मार्गदर्शक शिक्षक व पालकांना ट्रॉफी, सर्टिफिकेट व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री उत्तम बेहेरे व प्रदीप बाबर यांचाही मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विज्ञान मंडळ अध्यक्ष श्री उत्तम बेहेरे, श्री प्रदीप बाबर, श्री यतिराज सुरवसे ,श्री. अमोल रणदिवे ,श्री.सोमनाथ सपाटे ,श्री. निलकंठ लिंगे, डॉ .भारत इंगवले यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमासाठी सांगोला तालुक्यातील प्रत्येक प्रशालेतील गुणवंत विद्यार्थी त्यांचे मार्गदर्शक शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान मंडळ जिल्हा उपाध्यक्ष सुनिल लिगाडे सर यांनी केले.आभार विज्ञान मंडळ जिल्हा सदस्य सोमनाथ सपाटे सर यांनी मानले.