महाराष्ट्र

सांगोला रोटरी क्लबतर्फे सूतगिरणी कामगारांची रक्त तपासणी..

सांगोला रोटरी क्लब तर्फे भाई डॉ.गणपतराव देशमुख सह्कारी सूतगिरणी सांगोला येथील काम्गारांची रक्त तपासणी करण्यात आली..रोटरी क्लबचे चार्टर सदस्य डॉ.प्रभाकर माळी यांच्या प्रेरणेतुन रोटरी अध्यक्ष इंजि.विकास देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिर संपन्न झाले.

.या मध्ये १२५ हून अधिक पुरुष व महिला कामगारांची रक्त शर्करा तपासण्यात आली..रोटरी क्लबचे सदस्य व संजीवनी पॅथॉलॉजी चे रो.डॉ.महादेव कोळेकर यांनी सर्वांची रक्त तपासणी करुन त्यांनी व रो.डॉ.प्रभाकर माळी यांनी उपस्थितना योग्य मार्गदर्शन केले..

या प्रसंगी रोटरी क्लबचे सद्स्य रो.इंजि.मधुकर कांबळे,रो.श्रीपती आद्लिंगे,रो.शरणाप्पा हळ्ळीसागर,प्रा.राजेंद्र ठोंबरे, रो.माणिकराव भोसले,डॉ.अनिल कांबळे तसेच सूत गिरणीचे व्हाईस चेअरमन नितीन गव्हाणे, मॅनेजिंग डायरेक्टर काळे साहेब,अधिकारी विजय वाघमोडे सो,पाटील सो व इतर स्टाफ उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button