महाराष्ट्र

स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आज मोफत सुपर स्पेशलिटी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

सांगोला शहरातील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत स्पंदन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल जुना मेडशिंगी रोड वाडेगाव नाका सांगोला येथे मोफत सुपर स्पेशलिटी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आज रविवार दिनांक 15 जून 2025 रोजी दुपारी १ ते ५ या वेळेत करण्यात आलेले आहे.तरी या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आव्हान संयोजकाच्या वतीने करण्यात आलेले आहे .

या शिबिरामध्ये मेंदू व मनका तज्ञ डॉ. देवदत्त पाटील हे मेंदूच्या व मणक्याच्या संदर्भातील सर्व आजार डोकेदुखी ,मान दुखी ,पाठ दुखी, कंबर दुखी ,ब्रेन ट्युमर ,झटके येणे ,अपघातांमध्ये मेंदूला झालेली इजा, अर्धांग वायू ,मेंदूमध्ये रक्त सकाळणे इत्यादी आजारांवर मोफत तपासणी करणार आहेत.पोट विकार तज्ञ डॉ. अभिजीत चिंचोळे हे पोटाच्या संदर्भातील सर्व आजार, अपचन ,ऍसिडिटी ,पित्ताशयाचे विकार, पित्ताशयातील खडे ,स्वादुपिंडाचे आजार, आतड्याचे विकार, पोटात पाणी होणे, लिव्हर संदर्भातील आजारांवर तपासणी करणार आहेत.तसेच त्वचारोग तज्ञ डॉ. आदिती सुरवसे पाटील हे पिंपल, वांग, गजकर्ण, शेरनी ,इसबगोल ,कुष्ठरोग , शरीरावरील गाठी, पांढरे डाग ,सोरायसिस ,टक्कल पडणे , खरूज ,लहान बाळांचे त्वचेचे आजार, महिलांचे त्वचेचे आजार गुप्तरोग इत्यादींवर निदान उपचार केले जाणार आहेत

सदर शिबिरामध्ये डॉक्टरांनी रुग्णालयात भरती होण्याचा अथवा शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिल्यास महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत पेशंट रुग्णांवर उपचार केले जातील.सदर शिबिरामध्ये जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा तसेच शिबिराला येताना आपले जुने रिपोर्ट, फाइल्स व पूर्वीचे सर्व कागदपत्रे येताना घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे
सदरचे शिबिर स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जुना मेडसिंग रोड वाडेगाव नाका सांगोला येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
02187 299005 अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी संपर्क करावा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button