सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला शहरातील महूद रोड बायपास वर झालेल्या अपघातात गंभीर जखमी होवुन अनोळखी इसमाचा मृत्यू झाला असल्याची घटना 14 जून रोजी 2025 रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.
अपघाताची फिर्याद सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित आवताडे यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे.पुढील तपास पोहेकाँ घोंगडे हे करीत आहेत.