प्रज्ञा पैलवान झेक रिपब्लिक कडे रवाना…

सांगोला विद्यामंदिर प्रशालेतिल सेवानिवृत्त प्राचार्य भीमाशंकर पैलवान यांची सुकन्या प्रज्ञा भीमाशंकर पैलवान ही नुकतीच झेक प्रजासत्ताक या देशाकडे रवाना झाली आहे..
प्रज्ञा ही पुणे येथील एटलास कोप्को या आंतरराष्ट्रीय कंपनीत सिनियर डिझाईन इंजिनीअर म्हणून सेवेत आहे…विशेष प्रशिक्षणार्थी म्हणून कंपनीने तिची निवड केली असुन प्रशिक्षण पुर्ण केल्या नंतर तिच्यावर विशेष जबाबदारी सोपविण्यात येणार आहे..
प्रज्ञा पैलवान ही सांगोला विद्यामंदिरची माजी विद्यार्थिनी असुन तिने सोलापूर येथील वालचंद कॉलेज मधुन बी.टेक.पूर्ण केले आहे…तृतीय वर्षात शिक्षण घेत असताना तिचे कैंपस सिलेक्शन झाले होते…संस्था अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके व सांगोला विद्यामंदिर रिटायर्ड ग्रुप प्रमुख प्रा.राजेंद्र ठोंबरे व सर्व सद्स्य तसेच स्टेशन ग्रुप सद्स्य यानी दूरध्वनी वरुन अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत..



