महाराष्ट्र

न्यू इंग्लिश स्कूल मध्ये पाठ्यपुस्तक वाटप संपन्न

सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये महाराष्ट्र शासनाअंतर्गत शिक्षण विभागातर्फे उपलब्ध झालेली शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफक पाठ्यपुस्तक वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी विद्यालयातील इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थांना न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक प्रा.केशव माने यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.

यावेळी उपमुख्याध्यापक प्रा.संजय शिंगाडे उपप्राचार्य प्रा.संतोष जाधव पर्यवेक्षक दशरथ जाधव,तात्यासाहेब इमडे,जेष्ठ शिक्षक औदुंबर कांबळे,माणिकराव देशमुख ग्रंथालय विभाग प्रमुख अर्चना सरगर,ख्रिस्तिना डोंगरे ,निलोफर मुजावर,कविता पाटील व दिनेश बागुल सर उपस्थित होते. यावेळी बोलताना न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक प्रा.केशव माने यांनी विद्यार्थांना चालू शैक्षणिक वर्षात चिकाटीने व जिद्दीने अभ्यास करून उज्ज्वल यश मिळवावे असे आवाहन केले. शेवटी आभार प्रसिद्धीप्रमुख किरण पवार सर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button