महाराष्ट्र

न्यू इंग्लिश स्कूल चे गणित प्रज्ञा परिक्षेत घवघवीत यश

महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या गणित प्रज्ञा परिक्षेत सांगोला शहरातील नामांकित न्यू इंग्लिश स्कूल सांगोला मधील विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

गणित प्रज्ञा परिक्षेत यश मिळवलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार न्यू इंग्लिश स्कूल चे प्राचार्य प्रा.केशव माने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संस्थासंचालक प्रा.डॅा. अशोकराव शिंदे, प्रा. दिपकराव खटकाळे, इंग्लिश स्कूल चे उपमुख्याध्यापक प्रा. संजय शिंगाडे, पर्यवेक्षक दशरथ जाधव सर,तात्यासाहेब इमडे सर उपस्थित होते.

या यशस्वी विद्यार्थांनमध्ये इयत्ता पाचवी मधील नितीन अजित राऊत व अर्पिता प्रशांत तोरगळे यांचा समावेश आहे. यावेळी या विद्यार्थांना गणित प्रज्ञा परिक्षेसाठी मार्गदर्शन करणारे निलोफर मुजावर मॅडम व अविनाश सरगर सर यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.आपले मनोगत व्यक्त करताना न्यू इंग्लिश स्कूल चे प्राचार्य प्रा.केशव माने यांनी सदरच्या विद्यार्थांचे कौतुक करून पुढील स्पर्धा परिक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता शिंदे यांनी केले तर शेवटी आभार अनिल पवार यांनी मांडले.

या सर्व यशस्वी विद्यार्थांचे संस्थाध्यक्ष डॅा. अनिकेत देशमुख, संस्थासचिव विठ्ठलराव शिंदे सर, संचालक प्रा.डॅा. अशोकराव शिंदे,प्रा.दिपक खटकाळे व प्रा.जयंत जानकर यांनी विशेष कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button