महाराष्ट्र

जिल्हा परिषद शाळा मेडशिंगी येथे नवागतांचे उत्साहात स्वागत 

दिनांक 16 जून रोजी नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद शाळा मेडशिंगी येथे इयत्ता पहिली दाखल विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले

यावेळी विद्यार्थ्यांचे औक्षण मेड शिंगी गावच्या सरपंच सौ उमाताई इंगवले माता पालक गटाच्या सौ मंजुषा कांबळे सौ ज्योती युवराज राऊत सौ अमृता सरगर सौ हिना कसबे सौ अर्चना टेळे सौ वृषाली राऊत सौ प्रज्ञा कसबे सौ मोहिनी इंगवले सौ शिंदे यांनी केले

नंतर विद्यार्थ्यांची रथातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली त्याच वेळी त्यांचेवर पुष्पवृष्टी करण्यात आली नंतर सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री राजेश गडहिरे सर विनोद कसबे लखन कसबे यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी शासनाचे प्रतिनिधी व निरीक्षक म्हणून पंचायत समिती सांगोला चे अभियंता श्री लेंडवे साहेब उपस्थित होते सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री राजेश गडहिरे सर उपशिक्षक श्री चंद्रकांत बाबर सर यांनी परिश्रम घेतले तर मार्गदर्शन विस्तार अधिकारी श्री अमोल भंडारी साहेब गटशिक्षणाधिकारी श्री सुयोग नवले साहेब व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री अतुल राऊत यांचे लाभले .उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक श्री राजेश गडहिरे सर यांनी मानले

याच वेळी सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप पाठ्यपुस्तक वाटप बूट व पायमोजे वाटप करण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button