मौजे नाझरे येथील श्रीधर कन्या प्रशाला व ज्युनि. कॉलेज येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या सुरुवातीला इयत्ता- 5 वी तसेच 6 वी ते 10 वी या वर्गामध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. यास्मिन मुल्ला मॅडम यांच्या हस्ते गुलाब पुष्प व खाऊ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
तसेच नवीन पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले व नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या, याप्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.