महाराष्ट्र

*पी.एम.श्री प्राथमीक‌ शाळा पुजारवाडी येथे आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न*

सांगोला पुजारवाडी येथे सन.2025-26 या शैक्षणीक वर्षाची सुरुवात झाली.. पि.एम.श्री. प्रा.शाळा पुजारवाडी या शाळेने लहान मुला मुलींच्या शालेय जिवनाला सुरवात करणाऱ्या चिमुकल्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला असुन त्यानिमित्त वृक्षारोपण , मनोरंजनात्मक खेळ,शैक्षणिक साहित्याचे वाटप आसे उपक्रम प्रवेशोत्सवा निमित्त आयोजित करण्यात आले होते.

आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांचे स्वागत वाजता गाजत व पुष्प वृष्टी करीत करण्यात आले. महिला शिक्षकांनी आमादर साहेबांचे औक्षण केले.सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख व गटविकास आधिकारी मा.उमेशचंद्र कुलकर्णी साहेब गट शिक्षणाधिकारी नवले साहेब ,विस्तार अधिकारी कुमठेकर , भाई गणपतराव देशमुख सह.सुत गिरणीचे चेअरमन प्रभाकर माळी,पुरोगामी युवक संघटनेचे कार्याध्यक्ष विशालदिप बाबर , केंन्द्र प्रमुख अस्लम इनामदार तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य व शिक्षक वृंद यांच्या शुभहस्ते गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

सदर कार्यक्रमामध्ये बोलताना आमदार डाॅ

बाबासाहेब देशमुख म्हणाले की…जिल्हा परीषद शाळेत प्रवेशोत्सव साजरा करताना अत्यंत आनंद होत आहे.तसेच इयत्ता पाचवी च्या नविन तुकडीचेही स्वागत आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी केले.आमदार साहेब बोलताना पुढे म्हणाले की.मी स्वता प्राथमिक जिल्हा परीषद शाळेचा विद्यार्थी असुन ज्या-ज्या वेळी जिल्हा परीषद प्राथमीक शाळेत जाण्याचा योग येतो तेंव्हा खुप आनंद वाटतो.पुजारवाडी शाळेतील शिक्षकांनी या शाळेचा नाव लौकीक मिळवण्यासाठी खुप प्रयत्न‌ करीत असुन या शाळेतील विद्यार्थ्यांची पट संख्या कमी न‌ होता पट संख्या वाढत राहण्यासाठी या शाळेतील शिक्षक मेहनत घेत आहेत या भागातील गोरगरीब कुटु़ंबातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देऊन शैक्षणीक प्रवाहात आणण्याचे काम या शाळेतील शिक्षक करीत आहेत. या सर्व शिक्षकांचे अभिनंदन आमदार साहेबांनी केले.

आपल्या सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण घेत आसलेले विद्यार्थी गुणवंत आहेत.त्यांनी आपल्या तालुक्यांचे नाव शैक्षणिक क्षेत्रात वरच्या क्रमांकावर आनले आहे.आपल्या तालुक्यातील व जिल्ह्यातील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या देशाचे नाव उज्वल केले आहे. येणाऱ्या काळात तालुक्यातील विद्यार्थी देशाला उंच शिखरावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतील याचा मला विश्वास आसल्याचे मत आमदार बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले असल्याचे माहीती भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली…

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button