महाराष्ट्र

आत्मविश्वास ही शिक्षणाची जननी – प्रा. प्रबुद्धचंद्रझपके

गुरुवर्य बापुसाहेब झपके यानी सुरू केलेल्या शैक्षणिक संस्थेचा आज वटवृक्ष झाला आहे…खर्या शिक्षणात आत्मविश्वास निर्माण करण्याची क्षमता असते..त्यामुळे आत्मविश्वास ही शिक्षणाची जननी आहे,असे मत सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यानी व्यक्त केले..

 

नुकताच त्याना वेगवेगळ्या दैनिकांकडून गौरव गाथा व पॉवर-50 हा पुरस्कार प्राप्त झाला आहे..त्या प्रित्यर्थ सांगोला विद्यामंदिर रिटायर्ड ग्रुप व एस.एस.सी.75 जुनी अकरावी शेवटची बैच या दोघांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते….त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते…

 

सांगोला तालुका,शिक्षण क्षेत्रातील व समाज जीवनातील झपके परिवाराचे स्थान व कार्य या विषयावर वेगवेगळ्या दैनिकांनी दखल घेत त्यांचा गौरव केला आहे..त्या बद्दल त्यांचे अभिनंदन करण्या साठी सदर कार्यक्रम सांगोला विद्यामंदिर प्रशालेत आयोजित करण्यात आला होता…या वेळी एस.एस.सी.75 बैच तर्फे विलास नलवडे गुरुजी व उद्योजक रमेश फुले यांचे हस्ते झपके सराचा सत्कार करण्यात आला…

 

सांगोला विद्यामंदिर रिटायर्ड ग्रुप तर्फे सेवानिवृत्त प्राचार्य भीमाशंकर पैलवान व नारायण विसापुरे यानी झपके सराना सन्मानित केले..या प्रसंगी विलास नलवडे,विलास पाटील,साईराम कांबळे,भीमाशंकर पैलवान यानी मनोगत व्यक्त केले..

 

प्रा.राजेंद्र ठोंबरे यानी प्रास्ताविक व प्रा.बाळासाहेब वाघमारे यानी आभार प्रदर्शन केले..या वेळी एस.एस.सी.75 ग्रुप सद्स्य खंडू कुलकर्णी,सोपान माळी,अशोक जाधव,सतिश बिडीकर उपस्थित होते..रिटायर्ड ग्रुप सद्स्य प्रा.तायाप्पा आदट,अब्दुल गनी सय्यद,बबन बुंजकर,संजीव नाकिल,दामोदर नागणे,पांडुरंग भुईटे,मिलींद फाळके,शंकरराव डोंबे,अमर गुळमिरे उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button