महाराष्ट्र

नाझरा विद्यामंदिर प्रशालेत नवीन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

नाझरा (वार्ताहर)शैक्षणिक वर्ष 2025- 26 मधील शाळेचा पहिला दिवस.. या पहिल्या दिवशी नाझरा विद्यामंदिर मधील नवागतांचे स्वागत प्रचंड उत्साहात करण्यात आले. विविध प्रकारच्या फुलांची उधळण करत विद्यार्थ्यांचे वर्गात स्वागत करण्यात आले.

 

नवीन शाळा.. नवीन मित्र.. नवीन पुस्तक ..नवे दप्तर ..अशा सगळ्या नव्या संकल्पनेतून विद्यार्थी प्रचंड उत्साहाने मैदानात आले होते.नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत कुठे कुठे काय काय आहे ही पाहण्याची उत्सुकता लागून राहिली होती.. आपला वर्ग कोणता ..आपल्याला कोणती बँच बसायला मिळणार.. आपल्याला कोणते शिक्षक शिकवणार आहेत.. अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना आज मिळणार होती.दोन महिन्याची उन्हाळ्याची सुट्टी संपवून विद्यार्थी आज पहिल्याच दिवशी प्रचंड उत्साहाने शाळेत हजर झाले. नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता पाचवीच्या वर्गासाठी जवळपास 100 विद्यार्थी हजर होते. सर्वप्रथम पालक व नवीन विद्यार्थ्यांच्या हस्ते कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेस पुष्पहार समर्पित करण्यात आला . त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे प्रचंड उत्साहात मुख्याध्यापक बिभीषण माने, पर्यवेक्षक विनायक पाटील,पालक अंकुश बाबर, विष्णू पोरे दिलीप बाबर यांच्यासह सर्व शिक्षकांनी पुष्प देऊन स्वागत केले. इयत्ता पाचवी चा वर्ग फुलांनी व फुग्यांनी सजवलेला होता. पाचवीच्या वर्गात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगावरती विविध प्रकारच्या फुलांची उधळण शिक्षकांकडून करण्यात आली. टाळ्यांच्या गजरात या सर्व चिमुकल्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली पहिल्या दिवशीचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना दिसत होता..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button