जि. प. प्राथमिक शाळा गणेश नगर येथे नवीन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

नाझरा (वार्ताहार):-सांगोला तालुक्यातील चोपडी केंद्रात असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेश नगर येथे नवीन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेश नगरच्या मुख्याध्यापिका रूपाली पवार,सचिन खळगे, विशाल बाबर ,सदाशिव बाबर, महेश बाबर,सागर बाबर, धर्मेंद्र बाबर,विजय बाबर,राजू जावीर आणि सचिन जावीर, आदी पालकांच्या उपस्थितीत नवोदित चिमुकल्यांचे स्वागत करण्यात आले.
चिमुकल्यांच्या पावलांचे ठसे घेऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्याचबरोबर त्यांच्यावरती पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले नवोदित विद्यार्थ्यांचे चेहरे स्वागतामुळे भारावून गेले होते त्यांच्या चेहऱ्यावरचा स्पष्ट जाणवत होता दुपारच्या मध्यान भोजनामध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी मिष्ठांन भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेश नगरने अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत केल्यामुळे पालकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.



