कमलापूर प्राथमिक शाळेकडून विद्यार्थ्यांचे रथातून मिरवणूक काढून स्वागत

सदर कार्यक्रमासाठी कमलापूर गावचे सरपंच रावसाहेब अनुसे उपसरपंच नितीन काळे माजी उपसरपंच देविदास ढोले युवा उद्योजक बाबुराव बंडगर माजी सरपंच मधुकर तंडे. विकास सोसायटी चेअरमन धर्मराज टकले कमलापूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री आप्पासाहेब पवार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ दिव्या चंदनशिवे सौ सविता बंडगर सौ दिपाली लंबे सौ कल्पना ठोकळे सोमनाथ अनुसे प्रकाश ऐवळे रघुनाथ ऐवळेराहुल ऐवळे ज्ञानेश्वर तंडे अनिल खटके सागर अनुसे बंडगर सर नवनाथ पडवळे वैभव जाधव संजय बंडगर सतीश गोरड कुमार जाधव तसेच असंख्य पुरुष व महिला पालक उपस्थित होते
या कार्यक्रमात वेळी कार्यक्रमात नीट परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळवलेल्या अमृता खटके माधुरी टकले आरती ढोले या मुलींचा सत्कार करण्यात आला तसेच कमलापूर शाळेतील शिक्षिका श्रीमती स्वाती बनसोडे मॅडम यांचा अनिल खटके परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला.सदर कार्यक्रमावेळी सोमनाथ अनुसे व प्रकाश ऐवळे यांनी आपले मनोगत विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले व सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. कमलापूर शाळेतील पदवीधर शिक्षक रफिक मुलानी यांनी प्रास्तावित केले तर मुख्याध्यापक बशीर मुलांनी यांनी उपस्थित सर्व मान्यवराचे आभार मानले



