महाराष्ट्र

जि.प.प्रा.शाळा शिंदे-गव्हाणेवस्ती येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

सांगोला तालुक्यातील अकोला केंद्रातील जि.प.प्रा.शाळा शिंदे-गव्हाणेवस्ती येथे आज, १६ जून २०२५ रोजी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात शाळेत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे (नवागतांचे) स्वागत अकोला गावचे सरपंच सौ धनश्री गव्हाणे व शिक्षणतज्ञ श्री. विठ्ठलराव शिंदे सर यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रवेशोत्सवाची सुरुवात प्रभातफेरीने झाली. नवीन विद्यार्थ्यांना सजवलेल्या चारचाकी गाडीतून संपूर्ण गावातून मिरवणुकीने शाळेत आणण्यात आले. यानंतर सर्व नवीन विद्यार्थ्यांच्या डोक्यावर आकर्षक फेटे बांधण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या, ज्यावरून चालताना त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.शाळेत आगमन झाल्यावर मुलांच्या पावलांचे ठसे घेण्यात आले आणि त्यांचे औक्षण करून त्यांना शाळेत आणण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून अकोला गावच्या सरपंच, सौ. धनश्री गव्हाणे, तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा, सौ. कविता गव्हाणे, आणि उपाध्यक्षा, सौ. सोनाली आसबे उपस्थित होत्या. त्यांच्या शुभहस्ते, तसेच शिंदे-गव्हाणेवस्ती वरील सर्व पालक सदस्यांच्या उपस्थितीत नवीन दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली.
विद्यार्थ्यांसाठी विशेष भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये गोड पदार्थ म्हणून जिलेबी आणि नेहमीचा पौष्टिक शालेय पोषण आहार देण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजेश घोंगडे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.प्रवेशोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री. दत्तात्रय शास्त्रे सर व शिंदे-गव्हाणेवस्तीवरील सर्व पालक आणि माता पालक यांचे अनमोल सहकार्य लाभले. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे हा सोहळा अत्यंत यशस्वी आणि संस्मरणीय ठरला, ज्यामुळे नवीन विद्यार्थ्यांच्या मनात शाळेबद्दलची गोडी निर्माण झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button