महाराष्ट्र
शाळेच्या पहिल्याच दिवशी एसटी महामंडळाकडून मुलांना पास वाटप

नाझरा (वार्ताहर):- शाळेच्या पहिल्याच दिवशी सांगोला आगार कडून तालुक्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एसटीचे मोफत पास वाटप करण्यात आले.
नाझरा विद्यामंदिर प्रशालेत शाळेच्या पहिल्याच दिवशी सहावी ते दहावीपर्यंत असणाऱ्या एसटीने प्रवास करणाऱ्या मुलींना सांगोला आगाराकडून मोफत पास वाटप करण्यात आले. यावेळी वाहतूक नियंत्रण दिनकर सुतार, स्थानक प्रमुख पंकज तोंडे,मुख्याध्यापक बिभिषण माने, पर्यवेक्षक विनायक पाटील, ग्रंथपाल दत्तात्रय जाधव,सिद्धेश्वर काळे आदींच्या उपस्थितीत हे पास वाटप करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी पास मिळाल्यामुळे पालकांमधून याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.



