महाराष्ट्र

2025-26 अंतर्गत राष्ट्रीय खाद्य तेल बिया गोदाम बांधकामाकरीता अर्ज करण्याचे आवाहन

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान- तेलबिया या नवीन अभियानाला मंजूरी दिली आहे. यात समुह आधारित कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सदर अभियानांतर्गत सोयाबिन, करडई, सुर्यफुल या पिकांसाठी सोलापूर जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे.

प्रस्तुत योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्याकरीता 1 गोदाम बांधकाम ही बाब मंजूर आहे. या योजनेचा उद्देश गळीतधान्य उत्पादनाच्या सुरक्षित साठवणुक व मुल्य वृध्दी करणे.पात्रता लाभार्थी- सरकारी, खाजगी उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था, कंपनी (FPOS) आणि सहकारी संस्था या घटकांतर्गत मदतीसाठी VCP ला प्राधान्य देण्यात येईल. ज्या ठिकाणी गळीतधान्य पिके घेतली जातात तथापी गोदामाची व्यवस्था नाही अशा ठिकाणी गोदाम बांधकामासाठी ही बाब राबविण्यात येणार आहे. अभियानांतर्गत 250 मे.टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा रुपये 12.50 लाख यापैकी जे कमी असेल त्याप्रमणे अनुदान अनुज्ञेय राहील.

सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असून इच्छुक अर्जदार संस्थेने केंद्र शासनाच्या SMART वखार महामंडळ यांचे मार्गदर्शक सुचनांनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करणे आवश्यक आहे. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतरच संबंधित अर्जदार कंपनी सदर बाबीच्या लाभास पात्र राहील. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button