महाराष्ट्र

सोलापूर येथील  सैनिकी मुलां, मुलींचे  वसतिगृहात  प्रवेशबाबत आवाहन

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर यांचे अधिपत्याखाली सुंदरमनगर, विजापूर रोड, सोलापूर येथे सैनिक मुला, मुलींचे वसतिगृह असून, आजी, माजी सैनिकांच्या पाल्यांना येथे सवलतीच्या दरात निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध आहे. तसेच माजी सैनिक विधवा पत्नीचे पाल्य, शहीद सैनिकांच्या पाल्यांना व सैनिकांच्या अनाथ पाल्यांना वसतिगृहामध्ये नि:शुल्क भोजनाची व निवासाची सोय उपलब्ध आहे. इच्छुकांनी वसतिगृह अधिक्षक, अधिक्षीका यांचेकडून प्रवेश पुस्तिका, अर्ज घेऊन त्यांनी दिनांक 30 जून 2025 पर्यंत सैनिकी मुलां, मुलींचे वसतिगृह अधिक्षक, अधिक्षीका यांचेकडे अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार यांनी केले आहे

 

आजी,माजी सैनिकांचे तसेच सैनिक विधवांचे व शहीद सैनिकांचे पाल्य सोलापूर येथील शैक्षणिक संस्थेत इयत्ता 8 वी ते पुढील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत आणि जे वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छितात त्यांनी अर्ज  सादर करावेत तसेच वसतिगृह माहे जुलै 2025 पासून सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच खाजगी शिकवणीमध्ये प्रवेश घेतलेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांचे सैनिकी मुलां, मुलींच्या वसतिगृहामध्ये प्रवेश हा प्रथम प्राधान्य म्हणून पाल्याला प्रवेश त्याच जिल्ह्यात, शहरात शाळा किंवा महाविद्यालयामध्ये घेतलेला असावा व तदनंतर द्वितीय म्हणून खाजगी शिकवणीमध्ये प्रवेश घेतलेल्या पाल्यांनाही देण्यात येईल.

वरील प्रवेश प्रक्रियेमध्ये सैनिकांच्या पाल्यांना प्राधान्य देण्यात येईल. वसतिगृहात जागा उपलब्ध असल्यास इतर नागरी पाल्यांचा प्रवेशासाठी विचार करण्यात येईल. तसेच दिनांक 8 जूलै 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता प्रवेश बैठक आयोजित केली असून प्रवेश अर्ज सादर केलेल्या पाल्यांनी त्यांचे पालकासह प्रवेश प्रक्रियेसाठी संबंधित सर्व कागदपत्रासह उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी मुलींचे वसतिगृह 0217- 72301778, 9527584034 व मुलांचे वसतिगृह 0217- 72302228, 9890768965 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button