लोकशाहिर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी,12 वी, पदवी,पदव्युत्तर,वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने 60 टक्क्या पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या मांग,मातंग,मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग,मांग महाशी,मदारी,राधेमांग,मांग गारुडी,मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील विदयार्थी/विदयार्थीना महामंडळाकडून जेष्ठता व गुण क्रमांकानुसार महामंडळाकडे प्राप्त झालेल्या अर्जापैंकी प्रथम 03 ते 05 विद्यार्थांना निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेच लाभ देण्यात येणार आहे.
तरी इच्छुक मांग,मातंग,मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग,मांग महाशी,मदारी,राधेमांग,मांग गारुडी,मांग गोराडी,मादगी व मादिगा या जातीतील विदयार्थ्यांनी/विदयार्थींनी दि.10 जुलै 2025 पर्यंत महामंडळाचे जिल्हा कार्यालय,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,सात रस्ता, शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे,बीग बाजार समोर, सोलापूर येथे प्रत्यक्ष अथवा पोष्टाव्दारे पाठवावीत. अर्जा सोबत खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करावीत.
कागदपत्रे -अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती मिळण्यासाठी हस्तलिखित अर्ज, सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात उर्त्तीण झाल्याची मार्कलिस्ट ,शाळा सोडल्याचा दाखला,जातीचा दाखला,पुढील वर्षात प्रवेश घेतल्याची पावती, रेशनकार्ड,आधारकार्ड इत्यादी. दिलेल्या मुदतीनतंर प्राप्त अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. अशी माहिती जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ सोलापूर यांनी दिली आहे.



