सांगोला (प्रतिनिधी)महाराष्ट्र शासनातर्फे स्टेट कॉमन एट्रन्स टेस्ट सेल कडून घेण्यात आलेल्या पीसीएबी- एमएचटी-सीईटी.परीक्षेत सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले. यामध्ये प्राची बापूसाहेब बाबर ९८.०२, मानसी मधुकर सुरवसे ९७.५७ ,रुपेश राजकुमार गाटे ९६.३५ पर्सेंटाइल मिळवत सुयश संपादन केले.तसेच ८ विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा जास्त पर्सेंटाइल मिळविले.
या सर्व विद्यार्थ्यांना ज्युनिअर कॉलेज मधील शास्त्र शाखेतील शिक्षकांचे व मेरिट होम शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सचिव म.शं. घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, सर्व संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके,प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, उत्तम सरगर,काकासो नरूटे,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.