शैक्षणिकसांगोला तालुका

जि.प.प्रा.शाळा मेडशिंगी शाळेतील माता-पालक गटाचे परिणामकारक व दर्जेदारपणे कार्य

मेडशिंगी(वार्ताहर):-बालकांच्या विकासात, मातांचा सहभाग निुपण भारत अंतर्गत सुरु असलेल्या उपक्रमामध्ये माता-पालक गट अत्यंत परिणामकारक व दर्जेदारपणे कार्य करित असलेचे जि.प.प्रा.शाळा मेडशिंगी येथे दिसून आले.
सध्या सुरु असलेल्या भारत सरकारच्या निपुण उत्सव अंतर्गत जि.प.प्रा.शाळा मेडशिंगी येथे विभागीय समन्वयक श्री.काशिनाथ गेळे व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचे तालुका प्रतिनिधी श्री.बापूसाो ठोकळे, श्री.हमीद बागवान यांनी दि.4 जानेवारी 2023 रोजी भेट दिली. त्यांचे समवेत तालुका नोडल अधिकारी श्रीमती घोळवे मॅडम व मेडशिंगी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.राजेश गडहिरे, मेडशिंगी शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती सरला शिर्के या होत्या.
सदर भेटी अंतर्गत सर्व मातांनी माता पालक गटाचे महत्व व कार्य सांगितले. आतापर्यंत आलेल्या आयडिया व्हीडीओंची कृती व माहिती सांगितली.
यावेळी माता गटाच्या लिडर माता सौ.मंजुषा कांबळे,अर्चना टेळे, अमृता सरगर, प्रियांका इंगवले, परविण मुलाणी, वृषाली राऊत, ज्योती राऊत या उपस्थित होत्या.
गटाचे कामकाज व सहभाग पाहून विभागीय समन्वयक श्री.गेळे सर व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचे तालुका प्रतिनिधी श्री.बापूसाो ठोकळे व श्री.हमीद बागवान यांनी समाधान व्यक्त केले. व केंद्रप्रमुख श्री.राजेश गडहिरे यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!