महाराष्ट्र

दि 1 जुलैपासून धावणार मिरज– कलबुर्गी– मिरज स्पेशल ;अशोक कामटे संघटनेच्या पाठपुराव्याला यश

सकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूर–कलबुर्गी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी येथील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना, इतर रेल्वे संघटना व नागरिकांनी केली होती. मुंबई येथे झालेल्या मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये सकाळच्या सत्रात कोल्हापूर –कलबुर्गी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी झाली होती. सदर गाडी कोल्हापूर मधून शक्य नसेल तर ती मिरज मधून सुरू करण्यात यावी किंवा ते सुद्धा शक्य नसेल तर मिरज –कुर्डूवाडी डेमोचा विस्तार कलबुर्गीपर्यंत करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती.

 

या मागणीच्या अनुषंगाने मध्य रेल्वे कडून येणाऱ्या पंढरपूर आषाढी यात्रेनिमित्त सकाळच्या सत्रात 1 जुलै 2025 पासून गाडी क्रमांक 1107/08 मिरज– कलबुर्गी –मिरज दरम्यान स्पेशल 14 डब्यांची गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही गाडी मिरज येथून दररोज पहाटे 5 वाजता निघेल. व कलबुर्गी येथे दुपारी 1.30 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी कलबुर्गी इथून दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुटेल. व मिरज येथे रात्री 11.50 मिनिटांनी पोहोचेल. या गाडीस आरग, बेळंकी, सलगरे, कवठेमंकाळ, लंगरपेठ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, जवळा , वासूद,सांगोला, पंढरपूर, मोडलिंब ,कुर्डूवाडी ,माढा ,मोहोळ ,सोलापूर, अक्कलकोट, दुधनी, गाणगापूर इत्यादी ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत.

 

ही गाडी सुरू झाल्यानंतर पंढरपूरच्या पांडुरंगाबरोबर, सोलापूरचे सिद्धेश्वर, तुळजाभवानी, अक्कलकोटचे स्वामी समर्थ तसेच गाणगापूरचे श्री दत्त यांचे दर्शन घेण्याची सुविधा होणार आहे.व ही रेल्वे सेवा कायमस्वरूपी ठेवण्यात यावी याकरिता अशोक कामटे संघटनेचा रेल्वे विभागाशी पाठपुरावा सुरू आहे.


मिरज– कलबुर्गी– मिरज या रेल्वेस रेल्वे प्रशासनाकडून वेळापत्रकात दोन तासाचे लूज मार्जिन ठेवण्यात आलेले आहे त्यामुळे सदरहून रेल्वे मिरजेतून सकाळी 5 ऐवजी 7 वाजता सोडण्यात यावी. त्यामुळे प्रवाशाची सोय होईल,सर्व थांबे दिल्याने प्रवासात समाधानाचे वातावरण आहे व ती कायमस्वरूपी करण्यात यावी याकरिता रेल्वे विभागाकडे तिन्ही खासदार , डी आर यू सी सी सदस्य प्रयत्नशील व पाठपुरावा करत आहेत. तसेच प्रवाशांची या सेवेचा लाभ घेऊन प्रतिसाद द्यावा.

 

श्री निलकंठ शिंदे सर,अध्यक्ष:–शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना सांगोला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button