सांगोला तालुका

तरंगेवाडी गावात मुख्याध्यापकाच्या वाढदिवसानिम्मित जि. प.शाळेतील विद्यार्थ्यांनी लावली ५०१ वटवृक्ष

शिक्षक खुशालद्दीन शेख यांनी स्वखर्चातून ५१,००० रुपयांचे विद्यार्थ्यांना दिले वटवृक्ष

सांगोला – कोरोना काळात ऑक्सीजन अभावी अनेक नागरिकांना आपले जीव गमवावे लागले, त्यामुळे भविष्यात तरंगेवाडी गावात ऑक्सीजनची कमतरता भासू नये यासाठी जि. प.प्राथमिक शाळा सांगोलकर- गवळीवस्ती (तरंगेवाडी) ता-सांगोला शाळेतील मुख्याध्यापक सुहास कुलकर्णी यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त शाळेतील शिक्षक शेख यांनी स्वखर्चातून ५०१ वटवृक्ष तरंगेवाडी गावात गुरुवारी शाळेतील विद्यार्थ्यांच्यावतीने लावण्यात आले.
गुरुवारी ५०१ वटवृक्ष लावण्याच्या उपक्रमात तरंगेवाडी महसूल गावातील जि. प.प्राथमिक शाळा सांगोलकर- गवळीवस्ती, तरंगेवाडी, बंडगरवस्ती, पवार-कोळेकरवस्ती व गावडेवाडी या पाच शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
कार्यक्रमाला तरंगेवाडी गावचे सरपंच उज्ज्वला गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आशा तळे, माजी सरपंच शरद खताळ, केंद्र प्रमुख मनोहर इंगवले, पालक सुभाष तळे, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक रामहरी लवटे, महादेव सुरवसे, संतोष चौगुले, अशोक शिंदे तसेच शिक्षक वसंत बंडगर,प्रफुल्ल आमले, श्रीमंत गावडे, सुशांत शिंत्रे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश व्हनखंडे यांनी तर आभार खुशालद्दीन शेख यांनी केले.

मी दर महिना पगारातील १०,००० रुपये गरजू गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, शाळेसाठी तसेच वृक्षारोपण करण्यास रक्कम खर्च करत असतो. म्हणून आज मुख्याध्यापक सुहास कुलकणी यांच्या वाढदिवसानिमित्त ५०१ वटवृक्ष लावले
(खुशालद्दीन शेख, उपशिक्षक, जि. प.शाळा सांगोलकर -गवळीवस्ती)

वटवृक्षाचे झाड चांगल्या प्रकारे जगविणाऱ्या २१ विद्यार्थ्यांना दर वर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी ५०० रुपये किमतीचे शालेय दप्तर, वह्या, पाटी, पेन व पुस्तके बक्षीस म्हणून शिक्षक शेख हे त्यांच्या पगारातून विद्यार्थ्यांना देणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!