फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेजच्या पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये तब्ब्ल ६५ विद्यार्थ्यांची निवड

सांगोला : फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पूल कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन
कोल्ब्रो ग्रुप प्रा. लि. नाशिक यांचे तर्फे घेण्यात आले होते. या मध्ये
कर्मयोगी कॉलेज शेळवे, स्वेरी कॉलेज पंढरपूर, एस के एन सिंहगड कॉलेज व
इतर इंजिनिअरिंग कॉलेजच्या १९५ विद्यार्थ्यानी यामध्ये आपला सहभाग
नोंदवला होता. या मधून मुलाखत, संभाषण कौशल्य व टेस्टच्या माध्यमातून ६५
विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती फॅबटेक इंजिनिअरिंग
कॉलेजचे प्राचार्य डॉ आर बी शेंडगे यांनी दिली. यावेळी विद्यार्थ्यांना
अकॅडमिक डीन प्रा.टी.एन.जगताप, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद
पवार,डिग्री सिव्हिल इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख प्रा.आदलिंगे एस एस व
डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख प्रा.कोळेकर एस एस तसेच
ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर डॉ. साहेबगौडा संगणगौडर यांनी विशेष
मार्गदर्शन केले.
फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेज हे नेहमीच ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या
माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करीत असते . या
विभागामार्फत संभाषण कौशल्य व मुलाखतीचे प्रशिक्षण दिले जाते. याचबरोबर
विद्यार्थ्याच्या भविष्याचा विचार करून व करिअरच्या दृष्टीने या
विभागामार्फत मार्गदर्शन केले जाते .
या सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन
मा.श्री.भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर श्री. अमित रुपनर, कार्यकारी
संचालक श्री.दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री.संजय अदाटे,
महाविद्यालयाचे प्राचार्य व विभाग प्रमुख,शिक्षक यांच्यासह पालकांनी
देखील अभिनंदन केले.