महाराष्ट्र

फॅबटेक सिव्हिल इंजिनिअरिंग मधील ३ विद्यार्थ्यांची जिल्हा परिषद मध्ये निवड

फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला महाविद्यालयातील चालू शैक्षणिक वर्षांत सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग शिक्षण घेत असलेल्या ३ विद्यार्थ्यांची विविध जिल्हय़ातील जिल्हा परिषद मध्ये विविध पदांवर निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. रविंद्र शेंडगे यांनी दिली.

सन २०२४ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या सरळ सेवा पदभरती मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील विनायक कुमार लिगाडे यांची सोलापूर जिल्हा परिषद मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट पदांवर निवड झाली आहे,  प्रशांत शिवाजी कोळेकर यांची जिल्हा परिषद वर्धा येथे ज्युनिअर इंजिनिअर पदांवर निवड झाली आहे आणि तुषार विठ्ठल घाडगे यांची जिल्हा परिषद भंडारा येथे ज्युनिअर इंजिनिअर पदी निवड झाली आहे.

फॅबटेक मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महाविद्यालय नेहमीच अग्रेसर असुन विद्यार्थ्यांना शासकीय क्षेत्रात तसेच नामांकित मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी देण्यासाठी फॅबटेक कॉलेज मध्ये संपूर्ण तयारी करून घेतली जाते. याच अनुषंगानेच चालू शैक्षणिक वर्षांत सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील ३ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील ३ विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डॉ. रविंद्र शेंडगे, उपप्राचार्या डाॅ. विद्याराणी क्षीरसागर, सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. शिवानंद माळी आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button