जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी जून 2025 अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र 31 जुलै पर्यंत ऑनलाईन सादर करावे.

या सेवायोजन क्षेत्र माहितीचा उपयोग हा योजनाबध्द आर्थिक विकासात निरनिराळे प्रकल्प तयार करण्यासाठी व त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी, आवश्यक मनुष्यबळाचा अंदाज घेण्यासाठी होत असतो. अशा प्रकारची प्राप्त होणारी सांख्यिकी माहिती महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालय, नवी दिल्ली यांचे कडे दर तिमाहीस पाठविली जाते.
तरी सदर त्रैमासिक विवरणपत्र (ई.आर-1) 31 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर सादर करणे आवश्यक आहे. या वेबपोर्टलवर त्रैमासिक विवरणपत्र ई. आर-१ हे प्रत्येक तिमाही संपल्यानंतर ऑनलाईन सादर करण्यासाठी प्रत्येक आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड हे यापूर्वीच दिलेले आहेत त्याचा वापर करून भरण्यात यावा.
यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट, पार्कचौक, सोलापुर (0217-2992956) या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
त्रैमासिक विवरणपत्र (ईआर-1) ऑनलाईन भरण्याची पध्दत खालीलप्रमाणे:-
सर्व प्रथम आपल्या संगणकाच्या बाऊजरमाणे https://rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळ ओपन करावे. या संकेतस्थळावर नियोक्ता (नोकरी सूची) एम्प्लॉयर (लिस्ट अ जॉब) हा पर्याय निवडावा. स्क्रिनवर दिसणा-या नियोक्ता लॉग-इन (एम्प्लॉयर लॉगीन) या विओमध्ये आस्थापनेच्या गुजरआयडी/रजिस्ट्रेशन आयडी व पासवर्ड यांचा वापर करुन लॉग इन करावे, यशस्वीरित्या लॉग-इन झाल्यानंतर स्क्रिनवर डाव्या बाजूस उपलब्ध असणा-या मेन्यू मधील ईआर-1 या पर्यायावर क्लिक करावे, सदनंतर स्क्रिन वर दिसणा-या एन्टर या बटणावर क्लिक करुन आपल्या आस्थापनेची मनुष्यबळाबाबतची माहिती अद्यायावत करावी.
माहिती भरुन (Submit) झाल्यानंतर जनरेट रिसीट या बटणावर विलक करून आऊनलोड करुन घ्यावे व आपल्या माहितीस्तव ईआर-1 भरल्याबाबतची रिसीट जतन करुन ठेवावी.
यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट, पार्कचौक, सोलापुर (0217-2992956) या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त कौशल्य विकास ,रोजगार व उद्योजकता सोलापूर यांनी केले आहे



