नाझरे ता. सांगोला येथील श्रीधर कन्या प्रशालेचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक शहाजान मुलाणी व सौ. जस्मिन शहाजान मुलाणी या उभय दाम्पत्याचा हज यात्रेत जाऊन आल्यामुळे भव्य सत्कार करण्यात आला. हज यात्रेमुळे आमच्या जीवनात परिवर्तन झाले व मुस्लिम समाजातील प्रत्येकाने एकदा हज यात्रा करावी असे सत्कार प्रसंगी शहाजान मुलाणी यांनी मत व्यक्त केले.
मुलाणी सरांची हज यात्रा यशस्वी झाली व आम्ही भारावून गेलो व आम्हा मित्रपरिवारास हज यात्रेस गेल्यासारखे वाटले असे मत रविराज शेटे यांनी याप्रसंगी व्यक्त केले. सदर प्रसंगी श्रीधर शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव मुकुंद पाटील, मार्केट कमिटी संचालक सूर्यकांत आदाटे, शिक्षक नेते संजय बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण ढोबळे, अरबाज मुलानी व परिवार उपस्थित होता.