जि. प. प्रा. केंद्रशाळा नाझरे येथील इ. 1ते 4थी मधील गरीब -गरजू विद्यार्थ्यांना वि. का. वि. से. सोसायटी, नाझरे या संस्थेच्या माध्यमातून शालेय साहित्य मोफत वाटप करण्यात आले.
या साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर नाझरे गावचे मा. सरपंच विजय सरगर, सांगोला तालुका प. समितीचे माजी उपसभापती मा. सुनिल चौगुले, वि. का. वि. सेवा सोसायटीचे चेअरमन मा. सुनिल बनसोडे, शिक्षक नेते मा. अशोक पाटील (गुरुजी ), सोसायटीचे सदस्य मा. गोरखभाऊ आदाटे, मा.श्रीमंत सरगर, ग्रामपंचायत सदस्य मा. प्रा. विजय गोडसे (सर ), माजी सरपंच मा. संजय सरगर, माजी डेप्युटी सरपंच मा. शशिकांत पाटील, वि. का. वि. सेवा सोसायटीचे सेक्रेटरी मा. तुकाराम कुंभार (भाऊसो),शाळा व्यव. समिती नाझरे अध्यक्ष मा. ओंकार देशपांडे, उपाध्यक्ष मा. सचिन वाघमारे, पत्रकार मा. रविराज शेटे,समाज सेवक मा. जयपाल गुरव तसेच या शाळेचे मुख्याध्यापक मा. राजाराम कोळी (गुरुजी ), शिक्षक नेत्या श्रीम. नयन पाटील (मॅडम ), शिवाजी आडसूळ, सिद्धनाथ धुकटे, धनाजी पांढरे, इर्षाद मुलाणी, नंदादेवी दामोदर खुणे, माधुरी जुधळे हे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी उपस्थित होते. या मोफत शालेय साहित्य वाटप केलेल्या उपक्रमाबद्दल नाझरे गावातील सर्व ग्रामस्थांमार्फत कौतुक करण्यात येत आहे.