उत्कर्ष प्राथमिक विद्यालयात बाल दिंडी उत्साहात

अवघ्या वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त उत्कर्ष प्राथमिक विद्यालय,सांगोला येथे बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी इयत्ता पहिली ते चौथीतील काही विद्यार्थी श्री विठ्ठल रुक्मिणी च्या वेशात आले होते तसेच उर्वरित विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशात आले होते. इयत्ता चौथी मधील काही मुले संतांच्या वेशात आले होते. सभागृहामध्ये रिंगण सोहळा पार पडला
यावेळी मध्यभागी विठ्ठल रुक्मिणी तुळशी घेतलेल्या मुली त्यानंतर टाळ घेतलेली व शेवटी पताका घेऊन मुले रिंगण सोहळ्यात सहभागी झाली होती . यावेळी माऊली माऊलीचा जयघोष करण्यात आला. त्यानंतर इयत्ता पहिली ते चौथीच्या प्रत्येक वर्गातील मुलांनी विठ्ठलाच्या गाण्यावर नृत्य सादर केले. मुले वारकऱ्यासारखी तल्लीन होऊन नृत्य करत होती. ज्ञानोबा माऊली तुकाराम,विठ्ठल विठ्ठल जय हरी ,पंढरी पंढरी व टाळाचा गजर या जय घोषात मुलांची दिंडी सभागृहापासून निघाली होती. तसेच संपूर्ण शाळेभोवती दिंडी फिरली .
शेवटी शाळेच्या व्यासपीठावर पालखीचे पूजन माध्यमिक चे मुख्याध्यापक श्री सुनील कुलकर्णी सर यांच्या हस्ते करण्यात आले आणि
विठुरायाची आरती होऊन हा दिंडी सोहळा संपन्न झाला. मुलांना प्रसाद म्हणून केळी सांगोल्याचे व्यापारी श्री संजय वामन डंबळ व राजकुमार वामन डंबळ यांच्या तर्फे वाटप करण्यात आली. हा सोहळा प्राथमिकच्या उपमुख्याध्यापिका स्वराली कुलकर्णी बाई व मुख्याध्यापिका मागाडे बाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.