सांगोला फॅबटेक मधील ६ विद्यार्थ्यांची “पियाजिओ व्हेईकल्स प्रा. लि.” कंपनीत निवड
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च मधील सांगोला महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील ३ आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील ३ अशा एकूण ६ विद्यार्थ्यांची “पियाजिओ व्हेईकल्स प्रा. लि.” कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन झाली असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. रविंद्र शेंडगे यांनी दिली.
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस प्लेसमेंट मधुन मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील ऋषिकेश समाधान भंडारे, बालाजी बाबासो होनमाने आणि हणमंत मच्छिंद्र कुटे तसेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील कुमारी धनश्री सावंत, राहूल सरगर आणि संघर्ष शिंदे यांची कॅम्पस मुलाखतीतून “पियाजिओ व्हेईकल्स प्रा. लि.” कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली आहे.
“पियाजिओ व्हेईकल्स प्रायव्हेट लिमिटेड” हि ऑटो कंपनी आहे. इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या क्षेञातील अग्रणी “पियाजिओ व्हेईकल्स प्रा. लि.” ने लाॅन्च केले आहे. अशा या कंपनीत फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील ६ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली आहे.
“पियाजिओ व्हेईकल्स प्रा. लि.” कंपनीत निवड झाल्याबद्दल फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डाॅ. रविंद्र शेंडगे, उपप्राचार्या डाॅ. विद्याराणी क्षीरसागर, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. राहूल आवताडे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. हणमंत मल्लाड, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. धनंजय शिवपुजे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



