सांगोला तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकाच्या उपदानातून कपात केलेली संगणक रक्कम मुंबई हायकोर्टाच्या निकालानुसार येत्या पंधरा दिवसात देणार असे गटविकास अधिकारी उमेश चंद्र कुलकर्णी यांनी सांगोला तालुका पेन्शनर संघटनेस निवेदन देते प्रसंगी सांगितले.
संगणक रक्कम वसुली बाबत यापूर्वी सेवानिवृत्त शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष शिवानंद भरले यांच्या नेतृत्वाखाली जि.प. सोलापूर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते व याचे श्रेय मिळाले असल्याचे संघटनेचे अध्यक्ष वसंतराव दिघे व सल्लागार शंकर सावंत यांनी सांगितले. निवेदन देते प्रसंगी सेवानिवृत्त संघटनेचे सचिव अभिमन्यू कांबळे,सल्लागार सिद्धेश्वर झाडबुके, सहसचिव दत्तात्रय खामकर, सदस्य यांनी संगणक वसुली रक्कम तातडीने मिळावी याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी सांगोला उमेशचंद्र कुलकर्णी यांना समक्ष भेटून देण्यात आले व यावर लवकरच येत्या पंधरा दिवसात कार्यवाही करू असे कुलकर्णी यांनी सांगितले. संगणक रक्कम लवकर मिळणार असल्याचे समजल्यामुळे शिक्षकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असे संघटनेचे सदस्य दिनकर घोडके यांनी सांगितले.