महाराष्ट्र
सांगोला तहसील प्रशासनाचे पंढरपूरच्या वारीत कौतुकास्पद कार्य
आषाढी यात्रेचा सोहळा सांगोला तहसील मंडलाधिकारी तलाठी पोलीस पाटील जवळपास १४० कर्मचाऱ्यांनी तहसीलदार संतोष कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली रिद्धी सिद्धी दर्शन मंडपामध्ये १ ते १४ लाईन पर्यंत विठ्ठलाच्या दर्शन रांगेचे योग्य नियोजन करून उत्कृष्ट काम कौतुकास्पद कार्य केले आहे याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पंढरपूर येथे आषाढी वारी निमित्त गोपाळपूर पर्यंत दर्शन रांग गेली होती या रांगेचे रिद्धी सिद्धी दर्शन मंडप मध्ये सांगोला तहसील प्रशासनाकडे नियोजन देण्यात आले होते यामध्ये ३० जून पासून १० जुलै पर्यंत सकाळी आठ ते रात्री ८ व रात्री आठ ते सकाळी ८ असे सात पथके नेमण्यात आली दर्शन मंडपामध्ये स्वच्छता वारकऱ्यांना मदत करणे जेवणाची व्यवस्था वारकऱ्यांना त्रास झाल्यानंतर त्यांना मदत करणे अशा प्रकारचे नियोजन केले यामध्ये नायब तहसीलदार जलसंपदा जिल्हा परिषद यांचीही मोठे सहकार्य लाभले .
५ व ६ तारखेला आषाढी वारी निमित्त तहसीलदार संतोष कणसे यांनी रात्रंदिवस वारकरी वर्गाची सेवा करून योग्य व चांगले नियोजन केले सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत केली याचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे. यावेळी सर्व मंडळ अधिकारी तलाठी पोलीस पाटील कोतवाल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



