महाराष्ट्र

सांगोला तालुक्यातील युवा उद्योजकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – अॅड.गजानन भाकरे.

केंद्र व राज्य सरकारचे वतीने उद्योजकांसाठी विविध योजना सुरु करणेत आलेल्या आहेत.सांगोला तालुक्यातील युवा उद्योजकांनी या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन अॅड.गजानन भाकरे यांनी केले. लोकमंगल को-ऑप बँकेच्या वतीने आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत वाहन कर्ज वाटप प्रसंगी ते बोलत होते.

माजी सहकार मंत्री आमदार सुभाष बापु देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली लोकमंगल बँके मार्फत आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ,महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ,वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ,पर्यटन विभागातील आई योजना, पी. एम.एफ.एम.ई. फुड प्रोसेसिंग योजना अंतर्गत कर्ज वाटप करणेत येत आहे. सदर योजनांचा लाभ जास्तीत जास्त उद्योजकांनी घ्यावा असे आवाहन या वेळी करण्यात आले.

 

यावेळी स्थानिक शाखा सल्लागार गिरीष भाऊ नष्टे, लोकमंगल बँकेचे सांगोला शाखाधिकारी प्रविण भोसले तसेच ग्राहक,खातेदार,कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button